जिल्हा परिषद पुणे
समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती


1   योजनेचे नांव - जि. पं. २० टक्के निधी योजनेंतर्गत १००% अनुदानावर साहित्यांचा लाभ घेणेसाठी योजना

अर्ज करा

2   योजनेचे नांव - मागासवर्गीय व ५% टक्के दिव्यांग निधी २०% टक्के योजनेंतर्गत १००% टक्के अनुदानावर यशवंत घरकुलाचा लाभ योजना

अटी व शर्ती :

1. लाभार्थी मागासवर्गीय संवर्गातील (अनु.जाती/ अनु.जमाती/ विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्ग) असावा व दिव्यांग घरकुलासाठी सक्षम प्राधिकरणाचे दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र असावे

2. पूणे जिल्हयाच्या ग्रामीण भागातील रहिवासी असावा. (पुराव्यासाठी ग्रामसेवकांच्या स्वाक्षरीचा रहिवासी दाखला आवश्यक)

3. ग्रामीण भागातील मागासवर्गीय लाभार्थी हा बेघर अथवा भूमिहीन अथवा त्याचे नावे घर असेल तर ते कुडामुडीचे असणे आवश्यक आहे.

4. कुडामेडीचे घर अथवा मोकळी जागा लाभार्थीचे नावे असेल तर तसा नमुना नं.8 चा उतारा सादर करावा.

5. लाभार्थीच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती शासकीय / निमशासकीय सेवेत नसावी.

लाभाचेस्वरुप :

रु.120000/- 4 हप्तामध्ये थेट लाभ हस्तांतरण (DBT) दवारे बँकेत जमा करणेत येतात.

अर्ज करा