अ.नं. | योजनेचे नांव | योजनेबद्दल माहिती | |
1
| ७५ % टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना साहित्य पुरविणे | योजनेचे प्रारुप:- जिल्हा परिषद निधीमधुन जिल्हयातील शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीने उत्तम दर्जाचे (ISI Mark) सुधारीत औजारे/ साहित्य वाजवी किमतीत मिळावीतयासाठी जिल्हा परिषदेकडुन 75% अनुदानावर सदर योजना शासनाच्या डीबीटी धोरणानुसार राबविली जाते. या योजनेंतर्गत औजारांचा पुरवठा हा वस्तू स्वरुपात करण्याऐवजी खरेदी समितीने निश्चित केलेल्या सदर औजाराच्या मूल्याच्या 75% इतकी रोख रक्कम/अनुदान लाभार्थ्यांच्या बॅँक खात्यात जमा करण्यात येते. सदर योजनेचा लाभ अल्प, अत्यल्प व जास्तीत जास्त 10 एकर पर्यंत क्षेत्र असलेलया भू-धारकांना दिला जातो.
सदर योजनेचा लाभ घेणेसाठी शेतकऱ्यांनी खालील कागदपत्रांची पुर्तता करणे आवश्यक आहे.
1) संबंधित शेतक-याने विहीत कालावधीत आवश्यक कागदपत्रांच्या (7/12 ,8 अ तलाठयाकडील उतारा, आधारकार्ड/ ओळखपत्र, खरेदी करावयाच्या यंत्र/औजारे परिक्षण केल्याचा पुरावा) स्वयंसाक्षांकित प्रती सादर करावयाच्या आहेत.
i)लाभार्थी स्वत: शेतकरी असावा. ii)धारण क्षेत्र जास्तीत जास्त 10 एकरपर्यंत असावे. iii)अल्पभूधारक अत्यल्पभूधारक शेतक-यांना प्राधान्य. iv)अनु.जाती/जमाती, इतर मागास, खुल्या सर्व संवर्गातील शेतकरी अवजारे साहित्य मिळण्यास पात्र राहतील. v)आधारकार्ड असणे आवश्यकते बँक खात्यास जोडणे आवश्यक राहील. Vi)शेतक-याने उपरोक्त नमुद अटी व शर्तीनुसार परिपूर्ण प्रस्ताव punezp.gov.in या शासनाच्या वेबसाईटवर ऑनलाईन भरावा. प्राप्त प्रस्तावांची छाननी करुन गटविकास अधिकारी पंचायत समिती यांचे मार्फत पात्र लाभार्थी यादी जिल्हा स्तरावर मागविण्यात येऊन कृषि समिती सभेने अंतिम निवड केलेल्या लाभार्थ्याना लाभ देण्यात येईल.
2) केंद्र व राज्य शासनाच्या अधिकृत सक्षम तपासणी संस्थांनी ज्या यंत्र/औजाराचे रितसर परिक्षण(Testing) करुन ते BIS अथवा अन्य सक्षम संस्थानी निश्चित केलेल्या प्रमाणकानुसार(Standards)/तांत्रिक निकषांनुसार असल्याचे प्रमाणित केले असेल, त्याच यंत्र/औजाराची खुल्या बाजारातून शेतक-याने खरेदी करावयाची असून अनुदानाकरिता देयक सादर करताना त्याचे प्रमाणपत्र/तपासणी अहवाल(छायांकितप्रत) सादरकरणे आवश्यक राहील.
3) योजनेचा टाईप प्लॅन:- प्रति लाभार्थी शेतकऱ्यास जिल्हा स्तरीय खरेदी समितीने निश्चित करुन दिलेल्या खरेदी किमतीच्या 75टक्के अनुदानमर्यादेत 1) 5 एच. पी. ओपनवेल विदयुत मोटार पंप संच, 2) प्लॅस्टिक ताडपत्री (प्लास्टिक ताडपत्री हूक जॉईन्ट 6X6 मिटर) 3) 90 एम. एम. पी. व्ही. सी. पाईप, 4) बॅटरी ऑपरेटेड नॅपसॅक स्प्रे पंप या कृषि औजारे बाबींचा लाभ मिळणेसाठी शेतकऱ्यांनी प्रथम औजारांची खरेदी करुन नंतर त्यांच्या खात्यावर त्या त्या साहित्याची 75% अनुदानाची रक्कम वर्ग करणेबाबत नियोजन करण्यात येते.
लाभ दिल्या जाणाऱ्या बाबी दिले जाणारे अनुदान (किंमतीच्या 75% किंवा कमाल खालील प्रमाणे) 1) 5 एच. पी. ओपनवेल विदयुत मोटार पंप संच र.रु. 15,750/- 2) 90 एम. एम .पी. व्ही. सी. पाईप(20नग) र.रु. 13,200/- 3) प्लॅस्टिक ताडपत्री र.रु. 2,325/- 4) बॅटरी ऑपरेटेड नॅपसॅक स्प्रेपंप र.रु. 3,070/- |
अर्ज करा
|
2
| नैसर्गिक सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन योजना | 1) योजनेचे प्रारुप/अनुसूची नियम:-
1) जिल्हयातील निवडक शेतक-यांना नैसर्गिक सेंद्रिय शेतीसाठी प्रोत्साहन देणे. कालांतराने प्रचार व प्रसार जास्तीत जास्त शेतक-यांमार्फत करणे.
2) रासायनिक खतांचा बेसुमार वापर मर्यादित करणेआणि देशी गायीचे शेणआणि गोमूत्र यांचा वापर करुन तयार केलेल्या विविध प्रकारच्या खतांच्या(उदा.जीवंमृतआणि दशपर्णीअर्काचा वापर करणे.) जीवन द्रव्यांचे जमिनीतील प्रमाण वाढविणे.
3) नैसर्गिक वनस्पती उदा. कडूनिंब, करंज, सिताफळ, दशपर्णी, धोतरा इत्यादीचा आणिआले, मिरची, तंबाखू, गाईचे गोमूत्र या पदार्थाचा वापर करुन नैसर्गिक किटकनाशके/निमीसाईड तयार करुन त्यांचा वापर वाढविणे.
4) पाणीआणि खताच्या योग्य व्यवस्थापनासाठी शेतक-यांमध्ये जागृती निर्माण करणे.
5) तंत्रमार्गदर्शकांच्या मदतीने प्रशिक्षण कार्यक्रमआयोजित करणे. त्यांना नैसर्गिक शेतीसंबंधी आवश्यक प्रशिक्षण देणे. शेतीमालाचा उत्पादन खर्च कमी करणे/शेतीमाल उत्पादन प्रमाणिकरण करणे.
6) जिल्हयातील शेतीमधून सकसआणि दर्जेदार उत्पादनांची निर्मिती करुन शेतक-यांच्या या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी नियोजन करणे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीअधिनियम पहिलीअनुसूची(कलम100)पृष्ठक्र.173 अन्वये योजना राबविण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांच्या नावावर 7/12 व 8अ उतारा नावावर आहेअशाच लाभार्थ्यांना विभागामार्फत लाभ देणे अभिप्रेत आहे.
2) योजनेच्याअटी व शर्ती:-
1) नमुद योजनेतंर्गत लाभ घेणा-या शेतक-यांकडे किमान तीन एकरआणि कुटूंबाची जास्तीत जास्त 10 एकर जमिन असणे आवश्यक.
2) संबंधित शेतक-याने विहीत कालावधीत आवश्यक कागदपत्रांच्या (7/12, 8अ तलाठयाकडील उतारा,आधारकार्ड/ओळखपत्र,खरेदी करावयाच्या यंत्र/औजारे परिक्षण केल्याचा पुरावा) स्वयंसाक्षांकित प्रती आवश्यक.
3) शेतक-यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्धअसावी व त्याची नोंद 7/12 उता-यावर असावी.
4) सामुहिक सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्यास शेतक-याचे घोषणापत्र.
5) लाभार्थीची निवड करतांना शासननियमानुसार अनुसूचित जाती/जमाती, 30% महिलांना प्राधान्य देण्यात येईल.
6) सदरची योजना 100% अनुदानतत्वावर राबविण्यात येईल.
7) नमुद योजनेतंर्गत प्रति लाभार्थी शेतक-यास प्रोत्साहन अनुदान रु.65,000/-इतके मर्यादेत बाबींचा लाभ देण्यात येईल.
8) नमुद योजनेतंर्गत शेतक-यांस थेट लाभ हस्तांतरण (DBT) धोरणानुसार गिरगाय/थारपारकर गाय/साहीवाल गाय खरेदीसाठी अनुदान, शेतकरी प्रशिक्षण/अभ्यास दौरा, गांडूळ खत निर्मितीस यंत्र (10X3X2 फूट) व व्हर्मीकल्चर (गांडूळ) पुरविणे,जैविक खते/जैविक किटकनाशके पुरविणे, बायोडायनॅमिक खत युनिटसाठी प्रोत्साहनअनुदानदेणे, हिरवळीची खते पुरविणे व सेंद्रिय शेतीमाल उत्पादन प्रामाणिकरण करणे इत्यादी आवश्यक बाबीसाठी लाभ देण्यात येईल.
9) नमुद योजनेतंर्गत गाय या घटकाचा लाभ देत असताना प्रति शेतक-यास गाय खरेदी किंमतीच्या 75% किंवा रु.45000/-या पैकी जी रक्कम कमी असेलती अनुदान म्हणुन देय राहील. तसेच गाय खरेदी नंतर लाभार्थ्याने तीन वर्षासाठी गाईचा विमा उतरविणे आवश्यक राहील.
10) केंद्र व राज्यशासनाच्या अधिकृत सक्षम तपासणी संस्थांनी ज्या यंत्र/औजाराचे रितसर परिक्षण (Testing) करुन ते BIS अथवा अन्य सक्षमसंस्थानी निश्चित केलेल्या प्रमाणकानुसार (Standards)/ तांत्रिक निकषांनुसार असल्याचे प्रमाणित केले असेल, त्याच यंत्र/औजाराची खुल्या बाजारातून शेतक-याने खरेदी करावयाची असून अनुदाना करिता देयक सादर करताना त्याचे प्रमाणपत्र/तपासणी अहवाल (छायांकित प्रत) सादर करणे आवश्यक राहील.
11) लाभार्थी शेतक-यांनी कृषिनिविष्ठा/ साहित्य खरेदी अधिकृत विक्रेते/ कृषि विज्ञान केंद्र/ व्ही.एस.आय. यांचे कडून रोखीने किंवा कॅशलेस पध्दतीने करावी. कॅशलेस पध्दतीने खरेदी करताना शेतकऱ्याच्या आधारक्रमांकाशी निगडीत स्वत:च्या बॅँक खात्यातून, विक्रेत्याला किंमतीचे प्रदान करावे. म्हणजेच NEFT,RTGS,IMPS इत्यादी Electronics Fund Transfer किंवा धनाकर्ष (डिमांड ड्राफट)/ धनादेशाव्दारे(चेक) किंमतीचे प्रदान होणे आवश्यक आहे व त्याचा पुरावा अनुदानाच्या मागणीचा दावा करताना सोबत देणे आवश्यक राहील.
12) नैसर्गिक सेंद्रिय शेती योजनेतंर्गत शेतक-याने उपरोक्त नमुद अटी व शर्तीनुसार परिपूर्ण प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर करावा. प्राप्त प्रस्तावांची छाननी करुन गटविकास अधिकारी पंचायत समिती यांचे मार्फत पात्र लाभार्थी यादी जिल्हास्तरावर मागविण्यात येऊन कृषि समिती सभेने अंतिम निवड केलेल्या लाभार्थ्याना लाभ देण्यात येईल.
3) योजनेचा टाईप प्लॅन:-
प्रति लाभार्थी शेतकऱ्यास थेट लाभ हस्तांतरण (DBT) धोरणानुसार जिल्हास्तरीय खरेदी समितीने निश्चित करुन दिलेल्या खरेदी किमतीच्या 75/100 टक्के अनुदान मर्यादेत खालील बाबींसाठी अनुदान देणे.
1) देशी गाय खरेदी करणे गिर/थारपारकर/साहिवाल. (अनुदानरु.45000/-)
2) हिरवळीचे खतासाठी बियाणे पुरविणे उदा. ढेंचा/ताग.
3) बायोडायनॅमीक कंम्पोस्ट युनिट.
4) बायोडायनॅमिक लिक्विड मॅन्युअर कम पेस्टीसाईड देणे.
5) जैविक खते/ किटकनाशके उदा. बिव्हेरियाव निमिसाईड 10000 पी.पी.एम. पुरविणे.
6) गांडूळ खत निर्मितीस यंत्र पुरविणे व गांडूळ कल्चर देणे.
7) बायोडायनॅमिक कॅम्पोस्ट खत तयार करण्यासाठी लाभार्थी शेतक-यांस प्रशिक्षण देणे व निविष्ठा खरेदीसाठी अनुदान देणे.
8) सेद्रिय शेती बाबत लाभार्थी शेतक-यांना कृषि विज्ञान केंद्र येथे प्रशिक्षण देणे.
9) सहल – जिल्हयातील सेंद्रिय शेती करणा-या शेतक-याच्या प्रक्षेत्रासभेट - एकदिवस.
10) सेंद्रिय शेती उत्पादन प्रमाणिकरण करणे. कर्नव्हर्जन वर्ष 1,2,3 |
अर्ज करा
|
3
| २०० लि. प्रतिदिन क्षमतेचा सोलर वॉटर हिटर पुरविणे | योजनेचे प्रारुप:- जिल्हा परिषद निधीमधुन जिल्हयातील शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीने उत्तम दर्जाचे (ISI Mark) सुधारीत औजारे/ साहित्य वाजवी किमतीत मिळावीतयासाठी जिल्हा परिषदेकडुन 75% अनुदानावर सदर योजना शासनाच्या डीबीटी धोरणानुसार राबविली जाते. या योजनेंतर्गत औजारांचा पुरवठा हा वस्तू स्वरुपात करण्याऐवजी खरेदी समितीने निश्चित केलेल्या सदर औजाराच्या मूल्याच्या 75% इतकी रोख रक्कम/अनुदान लाभार्थ्यांच्या बॅँक खात्यात जमा करण्यात येते. सदर योजनेचा लाभ अल्प, अत्यल्प व जास्तीत जास्त 10 एकर पर्यंत क्षेत्र असलेलया भू-धारकांना दिला जातो.
सदर योजनेचा लाभ घेणेसाठी शेतकऱ्यांनी खालील कागदपत्रांची पुर्तता करणे आवश्यक आहे.
1) संबंधित शेतक-याने विहीत कालावधीत आवश्यक कागदपत्रांच्या (7/12 ,8 अ तलाठयाकडील उतारा, आधारकार्ड/ ओळखपत्र, खरेदी करावयाच्या यंत्र/औजारे परिक्षण केल्याचा पुरावा) स्वयंसाक्षांकित प्रती सादर करावयाच्या आहेत.
i)लाभार्थी स्वत: शेतकरी असावा. ii)धारण क्षेत्र जास्तीत जास्त 10 एकरपर्यंत असावे. iii)अल्पभूधारक अत्यल्पभूधारक शेतक-यांना प्राधान्य. iv)अनु.जाती/जमाती, इतर मागास, खुल्या सर्व संवर्गातील शेतकरी अवजारे साहित्य मिळण्यास पात्र राहतील. v)आधारकार्ड असणे आवश्यकते बँक खात्यास जोडणे आवश्यक राहील. Vi)शेतक-याने उपरोक्त नमुद अटी व शर्तीनुसार परिपूर्ण प्रस्ताव punezp.gov.in या शासनाच्या वेबसाईटवर ऑनलाईन भरावा. प्राप्त प्रस्तावांची छाननी करुन गटविकास अधिकारी पंचायत समिती यांचे मार्फत पात्र लाभार्थी यादी जिल्हा स्तरावर मागविण्यात येऊन कृषि समिती सभेने अंतिम निवड केलेल्या लाभार्थ्याना लाभ देण्यात येईल.
2) केंद्र व राज्य शासनाच्या अधिकृत सक्षम तपासणी संस्थांनी ज्या यंत्र/औजाराचे रितसर परिक्षण(Testing) करुन ते BIS अथवा अन्य सक्षम संस्थानी निश्चित केलेल्या प्रमाणकानुसार(Standards)/तांत्रिक निकषांनुसार असल्याचे प्रमाणित केले असेल, त्याच यंत्र/औजाराची खुल्या बाजारातून शेतक-याने खरेदी करावयाची असून अनुदानाकरिता देयक सादर करताना त्याचे प्रमाणपत्र/तपासणी अहवाल(छायांकितप्रत) सादरकरणे आवश्यक राहील.
अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत निर्माण करणे व सौर प्रकल्प कार्यान्वित करणे/सौर पथदिप दुरुस्ती करणे
लाभ दिल्या जाणाऱ्या बाबी दिले जाणारे अनुदान (किंमतीच्या 75% किंवा कमाल खालील प्रमाणे) 1) सोलर वॉटर हिटर 200 लिटर प्रतिदिन क्षमता - र.रु. 22,500/- |
अर्ज करा
|